काशी आमुची
काशी आमुची रेणुका, मुळपीठ नायीका ।
जे जे कल्पिले ते देसी, इच्छा पुरवीसी ।।
म्हणुनी प्रार्थना अंबेसी, पावे मज दिनासी ।। ध्रु।।
अणिमा महिमा महिमा, बाळा बगळा शामा।
सिता सावित्री, हिचं आमुची यमा ।।
ऐसे करुणेच् उत्तर मातापुर सुंदर ।।१।।
पायी पैंजण वाजती, कानी बाळ्या शोभती ।
माथा बिंदल्या झळकती, त्याची प्रभा फाकती ।।
कुंकुम लाविले लल्लाटी, हार शोभतो कंठी ।।२।।
अंबे नाव तुझे चांगले, मन माझे रंगले ।
अंबे नाव तुझे, भवानी जपतो हा निर्वाणी ।।३॥
Comments
Post a Comment