मनी ध्याय जो

मनी ध्याय जो रेणुकेच्या पदासी
मुखी गाय जो रेणुकेच्या पदासी
 पदी जाय जो रेणुका मंदिरासी 
  अशाला कशाला गया आणि काशी. 
 
करी प्रत्यही मातृतीर्थात स्नान 
मनी रेणुकेचे सदोदित ध्यान 
असे नित्य मातापुरक्षेत्रवासी 
अशाला कशाला गया आणि काशी.

सदा देई तातांस मातेस मान
परस्त्रीशी जो वागी मातेसमान
 न वाचे कधीही दुखवी कुणाशी
 अशाला कशाला गया आणि काशी

मोठ्यास जो वागवी आदराने
लहानांकडे पाही नित्य प्रेमाने
जीवनी जे चैतन्य जागविशी
अशाला कशाला गया आणि काशी

Comments

Popular posts from this blog

काशी आमुची

नमो विश्वमाते

जय परात्परे