Posts

लक्ष कोटि चंड किरण

लक्ष  कोटि चंड किरण सुप्रचंड बिलपति, अंब चंद्र वदन बिंब, दीप्ती माजी लोपती, सिंह शिखर अचलवासी मूळपीठ नायिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...। 1।  अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले, डोलताती पुष्प-हार भार फार दाटले, अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुद्रिका,  धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...। 2। इंद्रनीळ पद्म राग पांच हीर वेगळा, पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा, पैंजणादि भूषणे ती लोपल्या ती पादुका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...। 3।  इंद्र चंद्र विष्णु ब्रम्ह नारदादी वंदिती, आदि अंत ठावहीन आदिशक्ती भगवती, प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...। 4। पर्वताग्र वासी पक्षी अंब-अंब बोलती, विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती, अावतार कृत्य कार जडमुठादि तारिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...। 5। अनंत ब्रम्हांड कोटी पूर्वमुखा बैसली,  अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननी भासली, सव्य भागी दत्त-अत्री, वाम भागी कालिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका...

मनी ध्याय जो

मनी ध्याय जो रेणुकेच्या पदासी मुखी गाय जो रेणुकेच्या पदासी  पदी जाय जो रेणुका मंदिरासी    अशाला कशाला गया आणि काशी.    करी प्रत्यही मातृतीर्थात स्नान  मनी रेणुकेचे सदोदित ध्यान  असे नित्य मातापुरक्षेत्रवासी  अशाला कशाला गया आणि काशी. सदा देई तातांस मातेस मान परस्त्रीशी जो वागी मातेसमान  न वाचे कधीही दुखवी कुणाशी  अशाला कशाला गया आणि काशी मोठ्यास जो वागवी आदराने लहानांकडे पाही नित्य प्रेमाने जीवनी जे चैतन्य जागविशी अशाला कशाला गया आणि काशी

नमो विश्वमाते

नमो विश्वमाते नमो विश्वकर्ते , नमो विश्वमूले नमो विश्वभर्ते नमो विश्व निर्मूनिया खेळ केला , नमस्कार माझा तया रेणुकेला....!! जगन्मोहिनी तू जगन्नाथ माते , जगत्पालके तू जगा अन्नदाते जगच्चालके पाव या संकटाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!! भवा दूरकर्ती भवा उत्पन्नीते , भवा पासुनी या भवा सोडवीते भवा हारुनी वारि या संकटाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!! मुळी तूच उर्वी मुळाते प्रकाशी , मुळा पासुनी विश्व हे सोडवीसी मुळी मूळपीठी तू आवास केला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!! अशी नांदसी माय मातापुरी हो , जिची दृष्टि या सर्व सृष्टिवरी हो जिचा दर्शना दत्त अवधूत आला , नमस्कार माझा तया रेणुकेला....!! यात्रा भरे कार्तिक शुध्द पक्षी , अंबा उभी राहुनी मार्ग रक्षी भेटे प्रसन्ना वरदे जगाला , नमस्कार माझा तया रेणुकेला.........!! आत्मासि शक्ति तुजवीण नाहीं , शक्ति विणा दूजी करणीच नाहीं वरदान दे सुखी कर आत्म्याला , नमस्कार माझा तया रेणुकेला.....!!

जय परात्परे

जय परात्परे पुर्ण चिन्मये भगवती महा मंगलाईने ॥आद्य ईश्वरी विश्व व्यापिके शरण तुज मी पाव रेणुके॥दिनवत्सले पाय दाखवी।ञिपुर भैरवी या भवान्नवि॥निववी ताप तु आनंद  दाईके ।शरण तुज मापाव रेणुके।। 2।।  परममुढ मी जाण निश्चय दुढ मला शिवे नामय ही जय प्रगट व्हावया  ज्ञान दिपिके शरण तुज मी माय रेणुके.  ॥३ ॥ प्रपचंकारणी टाकले  मला मार्ग चुकलो ध्यास आसे तुझा. तुझ कुपे विने भय कसे चुके शरण तुझ मी पाव रेणुके. ।।4॥  विषय जाले हे चहु कडे आसे काम कोध हे व्याघ़ र्गजती रक्शी संकटी भ्रंती नाशीके शरण तुज मी पाव रेणुके।।। 5।।  आश्रय नसे आणि का जनी बालकासी का टाकले वनी धाव घे कडे माय रेणुके शरण तुज मी पाव रेणुके.।। 6।।  हेची मागणे माझी या मानी ह्यदय ग्रंथीके छेद योगीनी नुपेष्की कदा भक्त पोशीके शरण तुज मी पाव रेणुके।। 7।। श्रीदयानि दे त्रिपुर सुंदरी सर्व साक्षी तु भेट लवकरी गोसावी नंदन विनवी चंडीके शरण तुज मी पाव रेणुके।।।

काशी आमुची

काशी आमुची रेणुका, मुळपीठ नायीका । जे जे कल्पिले ते देसी, इच्छा पुरवीसी ।। म्हणुनी प्रार्थना अंबेसी, पावे मज दिनासी ।। ध्रु।। अणिमा महिमा महिमा, बाळा बगळा शामा। सिता सावित्री, हिचं आमुची यमा ।। ऐसे करुणेच् उत्तर मातापुर सुंदर ।।१।। पायी पैंजण वाजती, कानी बाळ्या शोभती । माथा बिंदल्या झळकती, त्याची प्रभा फाकती ।। कुंकुम लाविले लल्लाटी, हार शोभतो कंठी ।।२।। अंबे नाव तुझे चांगले, मन माझे रंगले । अंबे नाव तुझे, भवानी जपतो हा निर्वाणी ।।३॥

लोलो लागला अंबेचा

लोलो लागला अंबेचा,  भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,  धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।  प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी।  कन्या-सुख दाता, धन माझे मिथ्या वदतो वाणी।  अंती नेतील यमदुत। संगे न ये कोणी।  निर्गुण रेणुका भवानी जपतो हा निर्वाणी।। लोलो।।१।। पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर।  नयनी रक्षिता आकार। अवघा तो ईश्वर।  नाही सुख - दुःख देहाला भासे  शून्याकार।। लोलो।।२।। निद्रा लागली अभिध्यानी लागे अणुसंधनी |  लीला वर्णिता स्वरूपाची शिणली वेद वाणी।  देखूनी जगदंबा भवानी, त्रैलोक्य तारणी || लोलो ||३|| गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा।  दिवट्या उजळल्या सदोदित पोत चैतन्याचा।  आहं सोहं उदो उदो उदो बोलती चारी वाचा।।। लोलो।।४।। पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत। तेथे  भोपे भट। तेथे उंजाळ मोहाळ,  तेथे पाणी अलोट देशमुख तानाजी, झाला ब्रम्हरूप || ।५।।

श्री दुर्गा देवीची आरती

श्री दुर्गा देवीची आरती  दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥ त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परन्तु न बोलवे काही। साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा। अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा। नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥